सूरसुदान शौर्य स्वर संस्थेच्या वतीने गायन स्पर्धेचे आयोजन 

सूरसुदान शौर्य स्वर संस्थेच्या वतीने गायन स्पर्धेचे आयोजन 

 

ठाणे

 

सूरसुदान शौर्य स्वर संस्थेच्या वतीने मेरी आवाज मेरी पहचान या कार्यक्रमा अंतर्गत एकल (सोलो ) गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चार वयोगटामध्ये होणार असून  १२  ऑगस्ट पर्यंत स्पर्धेसाठी नावनोंदणी करता येणार आहे. 

या स्पर्धेत ९ ते १५, १६ ते ३०, ३१ ते ४५, ४६ ते ६० आणि ६० वर्षावरील सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही नियम व अटी ठेवण्यात आलेल्या आहेत.  स्पर्धा ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी कोरॉके ट्रकवर हिंदी गाण्याचा एक मुखडा व एक अंतरा गायचा आहे. स्पर्धकांनी गाणं गाण्यापूर्वी स्वतःचे नाव, व  वयोगटाचा उल्लेख करावा. सहभागी स्पर्धकांनी रजिस्टर क्रमांक आणि वयाचा दाखला खाली नमुद करण्यात आलेल्या  व्हाटसप क्रमांकावर पाठवावा, त्यानंतरच गाण्याचा व्हिडीओ अपलोड करण्यासाठी लिंक पाठविण्यात येईल. 

स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील महिला आणि पुरुष असे दोन स्वतंत्र गट असून या प्रत्येक गटातील प्रथम, दुसरा व तिसऱ्या क्रमांकास आणि 2 उत्तेजनार्थ विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेची अधिक माहितीसाठी 9022035397, 9020781700, 7900020858 या क्रमांकावर संपर्क साधावा.