ब्राम्हण शिक्षण मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाईन योग शिबीर
ठाणे
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने लॉकडाऊन केला असल्याने शाळा बंद आहेत असे असताना देखील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाईन योग शिबीर आयोजित केले होते याला मुलांनी उदंड प्रतिसाद देत घरातच योग करून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
कोरोनाचा विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने लॉकडाऊन जाहीर केला या लॉकडाऊनला जवळजवळ तीन महिने झाले. सरकारने दुकाने,बाजारपेठा,कामधंदे सुरु करण्यास काही अटींवर परवानगी दिली असली तरी शाळा,महाविद्यालये अजून हि बंद आहे. गेले ३ महिने घरात बसून मुले कंटाळलेले असताना त्यांच्यामध्ये साकारकत्मक ऊर्जा निर्माण व्हावी व मुलांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने ब्राह्मण शिक्षण मंडळाचे चिटणीस केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या वतीने पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सारिका दामले व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. नम्रता वडे यांनी व्हाट्सअप या ऑनलाईन माध्यमाचा वापर करून मुलांना योगासनांची माहिती देऊन त्यांना योग करण्यास प्रोत्साहित केले. मुलांनी देखील माहितीच्या आधारे घरातच योग करून अनोख्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.