ठाण्यात वाढला कोरोना रुग्ण वाढीचा वेग, प्रशासनाची लॉकडाऊनची तयारी


ठाण्यात वाढला कोरोना रुग्ण वाढीचा वेग, प्रशासनाची लॉकडाऊनची तयारी


ठाणे


ठामपा हद्दीतील माजिवडा -मानपाडा , कळवा, वागळे, लोकमान्य-सावरकरनगर, नौपाडा -कोपरी, मुंब्रा आणि दिवा या ग्रामीण भागात देखील कोरोनाने जोर पकडला आहे. मागील तीन दिवसात सुमारे एक हजार रुग्णांची वाढ झाली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे काही ठाणेकर सोशल डिस्टन्सचे पालन करत नाहीत. अनेकजण विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. महापालिका प्रशासन आणि पोलीस देखील हतबल झाले आहे. मागील तीन दिवसात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमालीचा वाढला आहे. परिणामी ठाणे शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे.


नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ठाणे शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  महापालिका प्रशासनाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य ती खबरदारी  घेण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका प्रशासनाने शहरात पुन्हा लॉकडाऊन  करण्याबाबत पोलीस प्रशासनाबरोबर बैठक घेऊन सोमवारपासून पुढील १० ते१५  दिवस शहरात लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा करणार आहेत. रुग्णसंख्या  झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याचे समजते.