अनेक आस्थापनाचे कर्मचारी अद्यापही रेल्वेसेवेपासून दूरच
मुंबई :
अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांना लोकल सेवेचा लाभ अद्यापही घेता येत नाही. बेस्ट, एसटी यांसारख्या परिवहन सेवेत मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना, विविध सरकारी व सहकारी बँका, पतपेढ्या, पालिका शिक्षक, सरकारीखासगी रुग्णालय कर्मचा यांसह पॅथॉलॉजी केंद्रातील कर्मचारी, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, बीएसएनएल, पत्रकार यांना लोकल सेवेतून दूरच ठेवले आहे. त्यामुळे या वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.
राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल धावत आहे. मात्र अंतर्गत ताळमेळ नाही. सरकारने १५ जूनपासून ज्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा यांसाठी लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. त्यांनाच प्रवास करण्यास मुभा असेल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर म्हणाले,
१५ जूनपासून सुरू झालेली उपनगरी रेल्वे राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा यांसाठीच आहे. यात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.