ठाण्यातील अभिनय कला केंद्राचे रोहित गायकवाड यांची महाराष्ट्र चित्रपट संघटना ठाणे जिल्हा शहर अध्यक्षपदी निवड
ठाणे
ठाण्यातील कचरा तलाव कट्टयावर अभिनय कला केंद्र सुरू करणारे दिग्दर्शक, अभिनेते रोहित गायकवाड यांची नुकतीच महाराष्ट्र चित्रपट संघटना ठाणे जिल्हा शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्रात काम करणार्या ठाण्यातील कर्मचार्यांच्या सेवेसाठी रोहित गायकवाड नेहमीच सक्रीय असतात. ठाण्यातील नवीन मराठी कलाकार, तंत्रज्ञांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा विश्वास यावेळी रोहित गायकवाड यांनी व्यक्त केला.
दोन वर्षापूर्वी ठाण्यातील कचराळी तलाव येथील कट्टयावर मा. ठामपा परिवहन सदस्य राजेश मोरे आणि नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांचा सहकार्याने दिग्दर्शक, निर्माते, कलाकार रोहित गायकवाड यांनी नवोदित कलाकारांसाठी सुवर्ण संधी म्हणून अभिनय कला केंद्राची सुरुवात केली. भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांकडून या प्लॅटफॉर्म ला मिळाला. अनेक कलाकार घडवले जात आहेत. असा सगळं प्रवास चालू असताना रोहित चंद्रकांत गायकवाड याना देवा ग्रुप महाराष्ट्र चित्रपट संघटना ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष पदी निवडून देण्यात आले.
देवा ग्रुपची सुरुवात तानाजी (भाऊ) मोरे यांनी केली आणि कलाकारासाठी सुवर्ण संधी आणि कलाकारांची समस्या सोडवण्या साठी महाराष्ट्र चित्रपट संघटना याची निर्मिती भाऊंनी केली आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रसिद्धी प्रमुख मदन ठाकरे, सचिव खालेद पटेल अंधारीकर आणि दिग्दर्शक, अध्यक्ष तेजस भंगाळे यांनी या कार्याला सहकार्य केले आणि संपूर्ण महाराष्ट्रात पदांची निवडणूक केली. या वरून असे दिसते आहे की मराठी पाऊल पुढेही पिढी घेऊन जात आहे. आणि देवा ग्रुप महाराष्ट्र चित्रपट संघटना नक्कीच महाराष्ट्रातील कलाकारांच्या समस्या सोडवतील.