ठाणे शहरात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी मोठ्या प्रमाणात: ३७ पथकांच्या माध्यमातून होत आहे फवारणी
ठाणे
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून ठाणे शहरात सोडियम हायपोक्लोईडची मोठ्या प्रमाणात फवारणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा आणि सर्व पदाधिकारी यांच्याकडून फवारणी अधिक तीव्र करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने ३७ पथकाच्या साहाय्याने ही फवारणी करण्यात येत आहे.सद्यस्थितीत सर्व प्रभाग समितीमध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरू असून ही मोहिम अधिक तीव्र आणि व्यापक करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
या मोहिमेतंर्गत आज आनंदनगर, कोपरी, काजूवाडी, चरई, सिद्धेश्वर तलाव, किसननगर, सी पी तलाव, लोकमान्यनगर, गोकुळदासवाडी आदी ठिकाणी फवारणी सुरू करण्यात आली. त्याचबरोबर आज सकाळी कादर पॅलेस, शमशाद नगर,इंशा नगर, अमृत नगर या झोन मध्ये येथे फवारणी करण्यात आली.या मोहिमेसाठी अग्नीशमन दलाची ८ क्वीक रिस्पाॅन्स वाहने, १३ ट्रॅक्टर्स, बोलेरो जीप आदी वाहनांचा वापर करण्यात येणार असून यामध्ये प्रमुख रस्ते, प्रतिबंधित क्षेत्रे, हाॅटस्पाॅटस् याबरोबरच संपूर्ण शहरामध्ये फवारणी करण्यात येणार आहे. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले आणि आरोग्य अधिकारी डाॅ. हळदेकर आदी उपस्थित होते.