२२ व २३ जून २०२० रोजी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन

२२ व २३ जून २०२० रोजी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन


ठाणे 


लॉक डाऊन काळामध्ये शिथिलता दिल्यामुळे जिल्हातील अनेक औदयोगिक कंपन्यांचे कामकाज पुन्हा सुरु झाले आहे. परप्रांतीय मजूर बाहेरगावी गेल्यामुळे कंपन्याना मनुष्यबळाची उणीव भासत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हातील  कंपन्यानी एकूण १०० रिक्त पदे उपलब्ध करुन दिलेली आहे. ही पदे भरुन बेरोजगारांना कामाची संधी देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास विभाग ठाणे यांनी दिनांक २२ व २३ जून २०२० रोजी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.


तरी इच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या वेबसाईटवर www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार मेळावा या ऑप्शन वर लॉग ऑन करुन त्यामध्ये दिलेल्या एनसीएस च्या www.ncs.gov.in या वेब साईटवर नोंदणी करून शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी पसंतीक्रम नोंदवावा. यानंतर उमेदवारांना उदयोजकांच्या सोयीनुसार शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल.अधिक माहितीसाठी श्रीमती.कविता.ह.जावळे मो.न -९७६९८१२००९ व श्री.आशुतोष साळी मो नं ९८९२५२४६८५ यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन श्रीमती.कविता.ह.जावळे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे यांनी केले आहे.