पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

ठाणे


ठाण्यात धनगर प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अगदी साध्या पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. कोरोनाचे सावट असल्याने धनगर प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे शहरातील नागरिकांना घरातच जयंती साजरी करण्याचे आव्हान करण्यात आले होते, नागरिकांनी या आव्हानाला प्रतिसाद देत घरातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा ठेऊन अभिवादन केले. शहरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घरातच जयंती साजरी करून या कोरोनाच्या लढाईत आम्ही शासनाच्या बरोबर असल्याचे प्रमाणित केले. 


३१ मे रोजी दरवर्षी धनगर प्रतिष्ठान,ठाणे व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत परंतु यावर्षी कोरोनाच्या महाभयंकर महामारीने  महाराष्ट्रात सर्वत्र हाहाकार माजला असून कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे गेले दोन अडीच महिन्यापासून लॉकडाऊन आहे. यामुळे सर्वच सार्वजनिक उत्सव,जयंती,जत्रा आदी कार्यक्रमांवर शासनाच्या वतीने  बंदी घालण्यात आली आहे. आणि या सर्व अटी,नियम आपल्या सुरक्षितेसाठी घालण्यात आल्या आहेत.


त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून धनगर प्रतिष्ठान,ठाणे व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने फक्त पाच संस्थेच्या पदाधिकऱ्यांचा उपस्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मासुंदा तलाव परिसरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या महिला अध्यक्षा माधवी बारगीर, अध्यक्ष दीपक कुरकुंडे, कार्याध्यक्ष महेश गुंड, खजिनदार अविनाश लबडे ,कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर आदी यावेळी उपस्थित होते.