चिनी व्हिडीओ ऍप टिकटॉक वर भारतात बंदी घालावी, रिपाइंची निदर्शने
कल्याण
चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी ऍप टीकटॉकवर भारतात बंदी आणावी व महाराष्ट्र्र सरकार ने चीनी कंपन्यांशी केलेला करार रद्द करावी,भारतात १५ करोड लोक वापरत असलेल्या टिकटॉक या चिनी व्हिडीओ ऍप मुळे चीन ला कोट्यावधींचा फायदा होतो. ते रोखण्यासाठी आणि चीनची आर्थिकदृष्ट्या कंबर मोडण्यासाठी चीनच्या मालावर जशी बंदी घालणे आवश्यक आहे तसेच चिनी व्हिडीओ ऍप टिकटॉक वर भारतात बंदी घालावी या मागणी साठी व चीनने लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर नियोजनबद्ध भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख उत्तर दिले त्यात २० भारतीय शूर जवान शहीद झालेत्या चीन ने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण येथे निदर्शने करण्यात आले. यावेळी रिपाइं कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मीनाताई साळवे, सहकार आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण पठारे, ठाणे प्रदेशचे नरेंद्र मोरे, रिपब्लिकन रिक्षा चालक मालक युनियन कल्याण भिवंडी अध्यक्ष राहुल कांबळे, रिपब्लिकन चालक मालक संघटना कल्याण शहर अध्यक्ष विलास गायकवाड इत्यादीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.