गरीबांचे जीव वाचविण्यासाठी अ‍ॅक्टीमेरा इंजेक्शन मोफत पुरवा

गरीबांचे जीव वाचविण्यासाठी अ‍ॅक्टीमेरा इंजेक्शन मोफत पुरवा!


* रिपाइं इंदिसे गटाची मागणी


ठाणे 


महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात चाचण्या घेतल्या जात असल्याने कोरोनारुग्णांची संख्या मोठी असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारची ही भूमिका अत्यंत रास्त आहे. त्याबद्दल राज्य सरकारचे कौतूकच केले पाहिजे. मात्र, अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना अ‍ॅक्टीमेरा (Actimera Inj 400 mg) हे इंजेक्शन दिले जाते. त्याची किमंत गोरगरीबांना परवडणारी नसल्याने सदरचे इंजेक्शन प्रधानमंत्री जनआरोग्य आणि म. फुले आरोग्यदायी योजनेत उपचार घेणार्‍या रुग्णांना मोफत देण्यात यावे, अशी मागणी रिपाइं एकतावादी (इंदिसे गट)चे युवाध्यक्ष तथा माजी नगरसेवक भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. कोरोनामुळे न्यूमोनिया होत आहे.परिणामी,  श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असल्याने रुग्णांना व्हेटींलेटर्सवर ठेवण्याची वेळ सरकारी वैद्यकीय यंत्रणांवर आली आहे. कफ वाढल्याने फुफ्फसांची कार्यक्षमताही कमी होत असते. ही क्षमता वाढविण्यासाठी विविध रुग्णालयांमध्ये अ‍ॅक्टीमेरा ( (Actimera Inj 400 mg)) हे इंजेक्शन रुग्णांना देण्यात येत आहे. या इंजेक्शनचे बाजारभावातील मूल्य सुमारे 40 हजार रुपयांच्या घरात आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले आरोग्यदायी योजनेनुसार रुग्णालयता दाखल होणार्‍या गरीब रुग्णांची हे इंजेक्शन ऐपत नसते. त्यामुळे राज्य शासनाने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना हे इंजेक्शन मोफत पुरवावे, तशा सूचना राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात याव्यात, अशी मागणी भैय्यासाहेब इंदिसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे  केली आहे.
दरम्यान, या संदर्भात भैय्यासाहेब इंदिसे यांनी सांगितले की, आज राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्युचा दर वाढीस लागलेला आहे. वाढीस लागलेला हा दर केवळ न्यूमोनिया आणि श्वसन यंत्रणेत निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिपाक आहे. अशा स्थितीमध्ये गोरगरीबांचे जीव वाचविण्यासाठी अ‍ॅक्टीमेरा  (Actimera Inj 400 mg)) हे इंजेक्शन जर मोफत पुरवण्यात आले तर गरीब रुग्णांचे प्राण वाचतील.