सरकारकडे नियोजन व धोरण दिसत नाही. आमदार राजू पाटील याचं ट्विट

सरकारकडे नियोजन व धोरण दिसत नाही. आमदार राजू पाटील याचं ट्विट


कल्याणः


राज्यातील लॉकडाऊन कसा उठवणार? या प्रश्नाचं सरकारकडे तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आताही नाहीये. सरकारनं लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं आहे. सरकारकडे नियोजन व धोरण दिसत नाही. असं ट्विट आमदार राजू पाटील यांनी केलं आहे. सरकारच्या 'मिशन बिगीन अगेन'चा तिसरा टप्पा आज सोमवारपासून सुरू झाला. खासगी व सरकारी कार्यालये पुन्हा सुरू होत असल्यानं मुंबईकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले आहेत. हे सर्व चित्र पाहून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सरकारकडे नियोजन व धोरण नसल्याची टीका केली आहे.


राज्य सरकारने खासगी, सरकारी कार्यालयांतील उपस्थितीविषयी आदेश दिल्याने कर्मचाऱ्यांनी ऑफिस व कार्यालय गाठण्यासाठी बेस्ट बसेससाठी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. पश्चिम द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कल्याण- डोंबिवलीतही मुंबई गाठण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारला लॉकडाऊनचा एक्झिट प्लान काय असा सवाल केला होता. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं. असं ते म्हणाले होते.


" alt="" aria-hidden="true" />