मीरत मेट्रोचा ठेका चिनी कंपनीला कोणी दिला- डॉ. आव्हाड
ठाणे
आत्मनिरर्भरच्या गप्पा मारुन झाल्यानंतर भारतीय कंपनीला डावलून मीरत मेट्रोेचा ठेका चिनी कंपनीला कोणी दिला. आधी हा ठेका रद्द करायला सांगा, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला ‘आरसा’ दाखवला आहे.
भारत-चीन हिंसक झटापटीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. चीनने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
डॉ. आव्हाड यांनी ट्वीट करुन, “12 जूनला दिल्ली मीरत मेट्रो च्या कामात एलटी या भारतीय कंपनीलाला डावलून चिनी ’शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी’ ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा. आत्मनिर्भर च्या गप्पा मारून झाल्यावर 12 जून 2020 ला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. कुणी दिलं कॉन्ट्रॅक्ट? रेल्वे कुणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या ना?” त्यानंतर 15 जूनला चिन्यांनी आपल्या 20 जवानांना मारले. कसले बोंबलाचे परराष्ट्र धोरण???“ असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, या आधी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, . चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलं. त्यामुळे चीनला धडा शिकवायला पाहिजे, असेही म्हटले आहे. चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे ‘लाल आंखे’ करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता? असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.