मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

ठाणे


 कोरोनाची महामारी दिवसागणिक वाढत आहेत या महामारीला रोखणे आता खूप महत्वाचे झाले आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता व  कोरोना कोविड -१९ महामारीच्या  प्रदुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी देशात तसेच महाराष्ट्रात प्रत्येक जन आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. या अश्याच प्रकारे ठाण्यात सुद्धा या कोरोन रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे यांच्या कडून सिद्धेश्वर तलाव परिसरातील  सेन्ट्रल कॉम्प्लेक्स,रमाबाई नगर, एकता मित्र मंडळ (सर्विस रोड) आणि पाटील वाडी (सिद्धेश्वर हाईट्स) या चार ठिकाणी रविवारी मोफत   आरोग्य शिबिर भरविण्यात आली होती. या परिसरात ५० हजारापेक्षा जास्त नागरिक राहतात.  या शिबिरात सोशल डीस्टसिंगचे नियम पाळून सर्वांची थर्मल स्क्रीनिंग केली. तसेच संबंधीत लोकांना कोरोनाबाबत जनजागृती केली. या परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक औषध अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्यांचे वाटप या अगोदरच करण्यात आले आहे.

 या शिबिरासाठी होणारी गर्दी टाळण्या साठी हे शिबीर केवळ सिद्धेश्वर तलाव परीसारासाठीच मार्यादित करण्यात आलेले होते. या प्रकारची शिबिरे ठाणे लोकसभा क्षेत्रात ठीक ठिकाणी  होणार आहेत. नागरिकांनीही या शिबिरांना सोशल  डीस्टसिंग पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या शिबीरासाठी डॉ अस्मिना सिद्दीकी,शबनम मुलानी,डॉ ठुबे,डॉ कोरे आदीचे सहकार्य लाभले.एकीकडे कोरोनाच्या भीतीमुळे सर्व खाजगी दवाखाने बंद असताना सिद्धेश्वर तलाव परिसरातील डॉ अस्मिना सिद्दीकी,शबनम मुलानी या मुस्लिम महिला डॉक्टरांनी जातीपतीचा भिंती तोंडात लॉक डाऊन काळात नागरिकांना अविरत सेवा दिली असल्याने खासदार राजन विचारे यांनी या डॉक्टरांचे कौतुक केले . सदर शिबिरांसाठी स्थानिक रहिवाश्यांनी खासदारांचे मनपूर्वक आभार मानले. या शिबिराला ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे, नगरसेविका नंदिनी विचारे, नगरसेविका रुचिता मोरे, माजी नगर सेवक मंदार विचारे, संजय सोनार, राजेश मोरे , स्थानिक रहिवासी कैलास राख व इतर रहिवाशी उपस्थित होते.