दाखल करून न घेणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कारवाई करा- धनगर प्रतिष्ठान

  इतर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करून न घेणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कारवाई करा

धनगर प्रतिष्ठान या संघटनेची मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री व ठाणे महापालिका आयुक्तांकडे मागणी  

ठाणे


 सध्या कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतात असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत त्यामुळे नागरिकांना घाबरून इतर आजार होत आहेत तसेच वातावरण बदलामुळे सर्दी,खोकला,ताप,आदी सह इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे परंतु नागरिकांना इतर कोणताही आजार झाला तर एकतर खाजगी क्लिनिक बंद असल्याने नागरिकांना हॉस्पिटल शिवाय पर्याय नाही असे असताना देखील ठाण्यातील  कोणतेही हॉस्पिटल उपचारासाठी नागरिकांना दाखल करून घेत नाही. नागरिकांना जनरल आजारांसाठी रुग्नालय उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी धनगर प्रतिष्ठान या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री व ठाणे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.इतर आजारांवर उपचार देण्यासाठी  दाखल करून न घेणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर कारवाई करावी असेही निवेदन नमूद केले आहे.  

यामुळे देखील नागरिकांचे मृत्यू होत आहेत.नागरिकांना इतर कोणताही आजारासाठी जर ऍडमिट होण्याची वेळ आली तर कोव्हीड चाचणी शिवाय कोणत्याच हॉस्पिटल मध्ये नागरिकांना दाखल करू घेत नाहीत , यामुळे देखील नागरिकांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होत असल्याचा घटना घडत आहेत परंतु हा मृत्यूचा आकडा कोरोनामुळे समोर येत नाही.यासाठीधनगर प्रतिष्ठान,ठाणे या संघटनेच्या वतीने  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,आरोग्यमंत्री राजेश टोपे व ठाणे महापालिका आयुक्त डॉ बिपीन शर्मा यांना इमेलद्वारा निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे कि याबाबत गांभीर्याने विचार करून नागरिकांना जनरल उपचार मिळण्यासाठी व गरज पडल्यास ऍडमिट करण्यासाठी कोणतेही कारण न देता उपचार देण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनास आदेश द्यावे आणि उपचारासाठी दाखल न करू घेणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करावी असे असे आदेश पारित करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.