कल्याण शीळ रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची आमदार राजू पाटील यांची मागणी
कल्याण:
भिवंडी-कल्याण-शील रस्ता हा चौपदरी होती. तो सहा पदरी करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर जास्त वाहनांची वर्दळ नाही. याच काळात काम करणे कंत्रटदाराला सोपे जात आहे. महिन्याभरापेक्षा जास्त लॉकडाऊनच्या कालावधीत कंत्रटदाराने गतीने काम सुरु केले आहे. कल्याण-शीळ दरम्यान काम गतीने केले जात आहे. मात्र या कामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह आहे.
अनेक नागरीकांकडून या कामाच्या गुणवत्तेविषयी तक्रारी केल्या जात आहे. हे काम सुरु असता राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी त्याठिकाणी देखरेख करीत नाही. हा रस्ता प्रचंड वाहतूकीचा आहे. सहा पदरी रस्त्याने रस्ता प्रशस्त होईल त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. मात्र लॉकडाऊन सुटल्यावर रस्त्यावर वाहतूकाचा ताण असणार आहे. रस्त्याचे काम निकृष्ट असल्यास लगेच हा रस्ता खराब होऊ शकतो. पुन्हा त्याची दुरुस्ती करणोही वाहतूकीच्या ताणामुळे शक्य होणार नाही. त्यामुळे आत्ता या रस्ते कामाची चौकशी करुन त्याची गुणवत्ता तपासली जावी. कंत्रटदाराने काम निकृष्ट केले असल्यास त्याला कामाचे बिल दिले जाऊ नये. त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.