झोपडपट्टी परिसरात आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांचे वितरण

झोपडपट्टी परिसरात आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांचे वितरण



ठाणे


ठाण्यातील वागळे प्रभाग समितीमधील सी.पी. तलाव, किसननगर, पाइपलाइन, लोकमान्यनगर आणि मुंब्रा या ठिकाणी सुरुवातीस आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक  औषधे वितरित करण्यात येणार आहेत. झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या परिसरामध्ये कोरानाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गुरुवारपासून आयुष मंत्रालयाने शिफारस केलेली आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक औषधे वितरित करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला. यामध्ये


याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना अतिशय काळजीपूर्वक करावे, प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णांचे अतिजोखीम गटातील व्यक्ती तसेच कमी जोखीम गटातील व्यक्तींची तत्काळ वर्गवारी करावी, बाधित रुग्णांना तातडीने स्थलांतरित करावे जेणे करून त्याच्यामुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, कंटेनमेन्ट झोनच्या बाहेर कोरानाचा संसर्ग वाढू नये, बाधितांची संख्या कुठे वाढत आहे, कशामुळे वाढते आहे याचा व्यवस्थित अभ्यास करावा अशा अनेक सूचना त्यांनी दिल्या. 


धोकादायक इमारतींना दुरुस्ती परवानगी देताना संसर्ग होणार नाही याची खातरजमा करूनच ती द्यावी अशा सूचनाही सिंघल यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या. कोरोना पसरू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील वगळून एका रस्त्यावर पाच बिगर अत्यावश्यक दुकाने सुरू करण्यासाठी ठामपा आयुक्त विजय सिंघल यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा परवानगी दिली होती. परंतु, नागरिकांनी तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने आयुक्तांनी अवघ्या एका दिवसात हा आदेश रद्द केला. तसेच बिगर अत्यावश्यक सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश पुन्हा दिले.