लोकमान्यनगर, सावरकनगर हाजुरी येथे दिली परिसराला महापालिका आयुक्तांनी भेट

लोकमान्यनगरसावरकनगर हाजुरी येथे दिली परिसराला महापालिका आयुक्तांनी भेट
संसर्ग वाढू नये याकडे लक्ष देण्याच्या केल्या सूचना


ठाणे


लोकमान्यनगर, सावरकनगर या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून या परिसरात संसर्ग वाढू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिका-यांना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे, परिमंडळ(3) उप आयुक्त अशोक बुरपल्ले, परिमंडळ उप आयुक्त, संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त नयन ससाणे, विजयकुमार जाधव, प्रणाली घोंगे आदी उपस्थित होते.


लोकमान्य नगर सावरकर नगर परिसरात कोरोना कोव्हीड 19 चा वाढता संसर्ग लक्षात नागरिकांना काही लक्षणे आढळल्यास शासनाचे निर्देशान्वये संबंधितांस अलगीकरण अथवा टेस्टिंगसाठी पाठविणे, पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास शासन निर्देशान्वये क्लोज कॉन्टॅक्ट वेयक्ती शोधणे, 500 प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व रहिवाशांचे सर्व्ह करणे, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संशयित व्यक्तीना शोधणे त्यांचा पाठपुरावा करणे, हायरिस्क व्यक्तींची चाचणी करणे, कोविड -१९ च्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांपैकी दुकाने , सोशल डिस्टन्स, जीवनावश्यक वस्तु पुरवठा आदी बाबत महापालिका आयुक्त श्री.सिंघल यांनी सविस्तर चर्चा करून उपाययोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कडक सूचना दिल्या.


यावेळी श्री. सिंघल यांनी वर्तकनगर प्रभाग समितीतंर्गत विजयनगर, लोकमान्यनगर पाडा क्र.१,२,३ आणि ४, कोरस हाॅस्पीटल, काजुवाडी, साईनाथनगर, काजुवाडी हाॅस्पीटल या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्यांनी हाजुरी येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या अलगीकरण कक्षाची पाहणी करून येथील सुविधांचादेखील आढावा घेतला. अलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या व्यक्तींना सर्वोतोपरी सेवासुविधा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी परिमंडळ(२) चे उप आयुक्त संदीप माळवी, वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, कार्यकारी अभियंता श्री. धुमाळ, चेतन पटेल आदी उपस्थित होते.



Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image