कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
27 टक्के रूग्ण बरे होवून घरी परतले
ठाणे
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये उपचारानंतर बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाण वाढत असून १५ मे रोजी बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 27 % टक्के इतके आहे. आज दिनांक १५ मे रोजी ७ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या २७३ इतकी आहे
ठाणे शहरात कोरोना कोव्हीड १९ रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोव्हीड बाधित आणि नाॅन कोव्हीड रूग्ण मिक्स होवू नयेत यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या कोव्हीड १९ रूग्णांसाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
कोव्हीड १९ च्या संशयित रूग्णांसाठी स्वतंत्रपणे उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
कोव्हीड१९ साठी निवडण्यात आलेल्या सर्व रुग्णालयामध्ये बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोना कोव्हीड १९ बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.