मेट्रो मॉल येथे उभारले जाणार नविन विद्युत उपकेंद्र



खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने नविन विद्युत उपकेंद्र मेट्रो मॉल येथे उभारले जाणार


डोंबिवली


सध्या तारापूर व पडघ्याहून येणाऱ्या विजपुरवठ्याच्या उच्च दाबाच्या विद्युतवाहीनीतूनविजपुरवठा मानपाडा रोड येथील प्रीमियर ऑटोमोबाईल्स कंपनीतील स्विचिंग स्टेशनला होतो. तदनंतर या स्विचिंग स्टेशनमधून कल्याण ग्रामीण विभातील काही भागसोनारपाडा व परीसरडोंबिवली पासून कल्याण पूर्व भागात त्याचे वितरण करण्यात येते. तारापूरपडघ्या पासून विद्युतपुरवठा वाहून नेणाऱ्या सदर वाहीन्यातून येणारा विजपुरवठा प्रिमीयर ऑटोमोबाईल येथील स्विचिंग स्टेशन मधे होइ पर्यंत अनेक वेळा विजपुरवठा खंडीत होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. याविभागात   विजपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नानुसार मेट्रो मॉल येथे एक नविन  स्विचिंग स्टेशन मंजूर करण्यात आले आहे.


त्यानुसारसदर मेट्रो मॉल येथील स्विचिंग स्टेशन पर्यंत भूमीगत केबल्स टाकण्याचे काम महाराष्ट्र वितरण कंपनीने कल्याण पूर्व येथील चक्की नाक्या पर्यंत पूर्ण केले होते. परंतु चक्कीनाका ते मेट्रोमॉल पर्यंत भूमीगत लाईन टाकण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडून परवानगी या ना त्या कारणाने  देण्यात येत नव्हती.  ही बाब खासदार कार्यालया तर्फे श्री. प्रफुल्ल देशमुख यांच्या या  कामाचा पाठपुरवठा करत असताना  निदर्शनास आली असता मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांकडे करून मराविमं ला परवानगी मीळवून देण्यात यश मीळवल .


दरम्यानच्या काळात करोना आजाराच्या थैमाना मुळे यासाठी लागणारी सामुग्री मीळण्यास विलंब झाला होता पण तरीही या कठीण परीस्थीतही या  कामाचा पाठपुरावा खासदार कार्यालया तर्फे चालूच ठेवण्यात आला व त्याची परीणीती म्हणून सदर कामास आता चालना मीळाली आहे.त्यानुसार आता  केबल्सव सर्व आवश्यक सामुग्री मराविमं कडून चक्कीनाका येथे आणण्यात यश आले असून सदर काम २६ मे रोजी चालू करण्यात येणार असल्याचे खासदार कार्यालया कडून कळवण्यात आले आहे ज्याला मराविमं कडून दुजोरा देण्यात आला असून सदर उपकेंद्राचे काम पूर्ण झाल्यावर विद्युत खंडीत होण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर कमी होणार आहे.




 

 



 

Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image