कोव्हीड-१९ चे जग प्रभावित झाले आहे. भारतात सध्या चौथ्या टप्प्याचा लॉकडाऊन सुरू आहे. दिवसागणिक रुग्णांची वाढ होत आहे. हे सगळं कधी थांबेल आणि पुन्हा जनजीवन कधी सुरळीत होईल याचा काही नेम नाही. याचा सर्वाधिक परिणाम रोजंदारीवर काम करणारे मजूर, कंत्राटी कामगार आणि आदिवासी बांधवांवर झाला आहे. रोजच्या कमाईवर ज्यांचे जीवन अवलंबून होते. त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. घरात काही नाही, पण घराबाहेर पडू शकत नाही अशा अवस्थेत असलेली कुटुंबं आणि रस्ता हेच ज्यांचे घर आहे अशा लोकांसाठी ठाण्यातील तीन हात नाका येथील गुरुद्वारातून मदतीचा ओघ सुरु आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत हे कार्य सुरु आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आणि संस्थेशी हितगूज करण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुद्वाराला भेट देली. शीख बांधवांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या कम्युनिटी किचनचीही पाहणी केली. या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून शीख बांधव करत असलेल्या मदतीबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.
ठाण्यातील मुख्य गुरुद्वाराला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट