ठाणे जिह्यातील सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये मद्य दुकाने बंद
ठाणे :
ठाणे जिह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मद्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. या आदेशानुसार ठाणे जिह्यातील मनपा, नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात घाऊक व किरकोळ मद्य विक्रीसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. तथापी सायं.5 वाजेनंतर हे व्यवहार सुरु ठेवता येणार नाही. संबंधितांना सोशल डिस्टसिंग, दर दोन तासांनी निर्जतुकीकरण, एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक राहणार नाही याची काळजी घेणे बंधनकारक आहे. सदर परवानगी ही फक्त सिलबंद मद्य विक्रीस आहे. सदर ठिकाणी मद्यपानास परवानगी नाही. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे सर्व विक्रेत्यास बंधनकारक असेल. आदेशाचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कायदेशीर कारवाई करणौयात येईल.
प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागात मद्यविक्रीला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळताच शहरांमधील दारू दुकाने तातडीने सुरू होतील या अपेक्षेने मद्यप्रेमींच्या भल्यामोठ्या रांगा मद्यविक्री दुकानांसमोर लागल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी तर एक किलोमीटपर्यंत रांगा लागल्या होत्या. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत यासंबंधी कोणताही निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आला नसल्याने अनेकांना निराश होऊन परतावे लागले.
ठाण्यातील गोखले रोड, कासारवडवली, वर्तकनगर, हरिनिवास सर्कल यांसारख्या अनेक भागात नागरिकांनी गर्दी केली होती. वर्तकनगर येथील विजयनगर परिसरात करोना रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, त्यानंतरही येथील परिसरातील मद्याच्या दुकानाबाहेर गर्दी झाली होती. पोलिसांनी हुसकावल्यानंतर मद्यप्रेमींनी घरचा रस्ता धरला. कल्याण-डोंबिवलीतील महात्मा फुले रस्ता, मानपाडा, शिळफाटा, महात्मा गांधी मार्ग, घरडा सर्कल, मुरबाड मार्ग या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रखरखत्या उन्हातही हे नागरिक मद्याची खरेदी करण्यासाठी रांगा लावून बसल्याचे चित्र होते. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील विविध भागांमधील दुकानांबाहेर ग्राहकांनी गर्दी केली होती. उल्हासनगरच्या मुख्य बाजारांमधील मद्याच्या दुकानांतही मोठी गर्दी झाली होती. अंबरनाथ शहरात काही दुकानदारांनी रात्रीच दुकानांबाहेर सामाजिक अंतर राखण्यासाठी खुणा आखल्या होत्या, तर सकाळी आठ वाजल्यापासून शहरात विविध दुकानांवर रांगा लागण्यास सुरुवात झाली होती.
देशात टाळेबंदी लागू झाल्यानंतर जिल्ह्dयातील सर्वच मद्याची दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यानंतर दीड महिन्यांपासून जिल्ह्dयातील सर्वच ठिकाणी मद्याची दुकाने बंद आहेत.