राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार नामांकन सादर करण्याचे आवाहन

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार नामांकन सादर करण्याचे आवाहन



   ठाणे 


: केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार १०१९-२० साठी नामांकने सादर करण्याबाबत कळविले आहे. सदरच्या पुरस्काराबाबतची नियमावली www.yas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. २६ मे २०२० पर्यंत क्रीडा संचालनालयाकडे  प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहिती साठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे (दुरध्वनी क्रमांक- 022 25368755) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे श्रीमती स्नेहल साळुंखे यांनी केले आहे.