खासगी रूग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिमंडळ स्तरावर समिती गठित

अवाजवी बिल आकारणाऱ्या तक्रारींसाठी प्रभाग समिती स्तरावर समिती


नागरिकांच्या तक्रारीवर होणार विनाविलंब कार्यवाही


खासगी रूग्णालयांवर बसणार अंकुश



ठाणे


कोरोना कोव्हीड 19 बाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रूग्णालय व्यवस्थापनांकडून महापालिकेने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अवाजवी बिल वसूल करत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी अवाजवी बिल वसुल करणाऱ्या खासगी रूग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांची अडवणूक टाळण्यासाठी परिमंडळ स्तरावर समिती गठित केली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिनांक 15 मे रोजीच्या आढावा बैठकीमध्ये दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ही समिती गठित केली आहे.


            त्या त्या परिमंडळाचे उपायुक्त हे त्या समितीचे अध्यक्ष असून वैद्यकिय आरोग्य अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी, प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष किंवा सचिव आणि संबंधित रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी आदींचा या समितीमध्ये समावेश आहे.


            सदर समिती ही खासगी रूग्णालयाने महापालिकेने निश्चित करून दिलेल्या दरांपेक्षा अवाजवी दराने आकारणी केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने निश्चित करून दिलेल्या दरानुसार बिलाची आकारणी करण्याबाबत विनाविलंब कार्यवाही करणार आहे. त्याचबरोबर अनेकवेळा खासगी रूग्णालय व्यवस्थापनाकडून बेडस् उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याच्याही अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने सदर समिती ही नागरिकांची अडवणूक होणार नाही याबाबत प्राधान्याने काम करणार आहे.










 








Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image