घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याची सरनाईक यांची पालिकेला विनंती
ठाणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला. मोठ्या संख्येनं कामगार बेरोजगार झाले. त्यांच्या हाताला कामही नाही आणि गाठीला पैसाही नाही. अनेकांना तर आपल्या घरातलं रेशन भरणंही दुरापास्त झालं आहे. अशा कामगारांच्या, नागरिकांच्या कळकळीपोटी त्यांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीनं ठाणे महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे.
अचानक आलेल्या कोरोना संकटामुळे नागरिकांना घर कसे चालवायचे हा खुप मोठा प्रश्न पडला आहे त्यातच अनेकांचे रोजगार गेल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे. सध्याच्या परिस्थिती पाहता पुढचे तीन ते चार महीने कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किमान पुढील तीन महिने तरी नागरिकांना काम धंद्यापासून लांब रहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना पगार मिळत नसल्यामुळे अन्नधान्य घेण्यासाठी पैसे नसणार तर ते पाणीपट्टी, घरपट्टी कसे भरणार या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील करदात्या नागरिकांना दिलासा द्यावा म्हणून पालिका हधीतील करदात्यांची या सन २०२०-२१ आर्थिक वर्षातील सहा महिन्यांची पाणीपट्टी, घरपट्टी पूर्णपणे माफ करण्यासंदर्भाचा विषय महासभेत चर्चेला घेवून आपण तात्काळ हा विषय मंजुर करावा.