नक्की वाईन शॉप खोलण्यामागच सरकारचं उद्देश्य काय
ठाणे
मा. उद्धव ठाकरे साहेब आजपर्यंत आपण या कोरोना युद्धात खूप छान भूमिका निभावलीत. पण आपल्या महाराष्ट्रात कोरोना पीडितांचे प्रमाण दिवसोदिवस दुप्पट होत आहे. ते आटोक्यात आणण्याकरिताही सरकार रोज नवनवीन पावले उचलत आहेत. त्यामध्येच दारूची दुकान उघडण्याला परवानगी देणे कितपत योग्य आहे? सकाळी घराबाहेर दैनंदिन वस्तू खरेदी करण्याकरिता गेले असताना दारूच्या दुकाना बाहेर भली मोठी रांग उभी पाहीली, त्यावेळेस वाटले काय हे सोशल डीस्टेनसिंग आणि लोकडाऊन सगळा दिखावाच. माफ करा मा. उद्धव साहेब पण जे विचार मनात आले ते सांगतेय.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्याकरिता सगळ्यांना घरी बसण्याचे आव्हान करणे, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे आणि एकीकडे आपले सरकार दारूविक्रीकरिता परवानगी देणे जेथे या नियमांचे प्रत्येक क्षणाला उल्लंघन होणे. या दारू खरेदीच्या रांगेत जर नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांचे नक्की जबाबदार कोण? त्या रांगेत उभा असणारा व्यक्ती की ती दारू विक्री करण्याकरिता परवानगी देणारे सरकार?
मला सर्व सामान्य नागरिक म्हणून आपल्या राज्य व्यवस्थेतील आर्थिक परिस्थितीची कल्पना आहे पण त्याकरिता अशी दारू विक्रीला परवानगी देणे कितपत योग्य? काही दिवसांपूर्वी मी आपले जनतेला केलेले आव्हान ऐकले होते त्यात आपण सर्व जनतेला घरी शांतपणे लोकडाऊन पाळण्याचे आव्हानं करत म्हणालात की आर्थिक नुकसान होतय आपल्या राज्याच पण ते इथल्या नागरिकांच्या जीवापेक्षा सद्या जास्त नाहीत ते तुमचे वाक्य ऐकून भारावून गेले होते मी एक नवी उत्तेजना अली होती की या लोकडाऊन संपल्यावर पुन्हा नव्याने आपण सगळे उभे राहू आणि डगमगलेली आपली अर्थव्यवस्था आपण सगळे मिळून ठीक करण्याकरिता प्रयत्न करू.
मा. उद्धव ठाकरे साहेब जशी आपल्या राज्याची अर्थ व्यवस्था डगमागायीत आलेय तशी महाराष्ट्रातील कित्येक घरातील अर्थ व्यवस्था डगमगलेय. पण तरीही ते कुटुंब प्रयत्न करतंय आपण सांगितलेल्या आव्हानंचे पालन करण्याचे.
आधीच काही मुठीभर लोक सर्वसामान्याचा या लोकडाऊन मध्ये गैरफायदा घेत आहेत आणि आता आपल्या या निर्णयामुळे त्याच सर्वसामान्यांचा कुटुंबात आर्थिक परिस्थिती बरोबर अजून एक समस्येची वाढ होणार आहे. या दारू विक्रीत सुद्धा फक्त सरकारची अर्थव्यवस्था थोडीफार ठीक होईल आणि त्या दारू विक्रेता आणि दारू उत्पादन करणाऱ्याचे फायदा.
मी दारू विक्रीच्या विरोधात नाहीये फक्त माझं सर्व सामान्य नागरिक म्हणून एवढेच म्हणणे आहे की साहेब जशी राज्य अर्थव्यवस्था डगमगलेय तशी बऱ्याच कुटुंबाची अर्थव्यवस्था डगमगलेय त्यामुळे हे असं अर्धवट लोकडाऊन करून आपण काही कोरोनाला हरवू शकत नाही. मग असं लोकडाऊन करण्याचा काय फायदा?
सौ. शिल्पा सचिन पवार - ठाणे