शीळ फाट्यावर ट्रॅफिक जाम
डोंबिवली
रेल्वे बंद असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवासी आणि अडकून पडलेले नागरिक रस्ते वाहतुकीने प्रवास करत आहेत. मुंबईकडून कल्याणच्या दिशेने येणा या वाहनांच्या तुलनेत शीळ मार्गावर जाणा या चारचाकी वाहनांसह बसची संख्या बुधवारी जास्त होती. बहुतांशी प्रवासी हे खासगी मोटार व बसने सकाळपासूनच प्रवासाला निघाले होते.
लॉकडाउनच्या चौथा टप्प्यात काही निर्बंध शिथील झाल्याने नागरिकांनी वाहने रस्त्यावर आणायला सुरुवात केली आहे. अनेक जण ई-पास काढून कल्याण-शीळ रस्त्याने मुंबई, पुणे व कोकणात जाऊ लागले आहेत. त्याच भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाल्याने वाहतुकीला अडथळा येत आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी सलग दुस या दिवशी शिळफाट्यावर वाहतूककोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मजूर आपापल्या राज्यांमध्ये गेल्यानंतर कल्याण- डोंबिवली शहरांमध्ये अडकून पडलेल्या पुणे, कोकणातील नागरिकांनी ई-पास मिळवून ठिकठिकाणी प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर ७२ तासांच्या आत प्रवासासाठी पोलीस परवानगी मिळत आहे. अनेक जण सकाळी उन्हाच्या आत प्रवास सुरू करत आहे. त्याच वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचा यांची वाहनेही कल्याण-शीळ मार्गाने मुंबईकडे जातात. त्यामुळे दिवसभराच्या तुलनेत या मार्गावर सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० पर्यंत वाहनांची वर्दळ अधिक असते. रस्त्याच्या कामामुळे वाहनांच्या वेगावर परिणाम होत असल्याने वाहनांची कोंडी होत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. एकेरी वाहतूक : कल्याण-शीळ रस्त्याचे काही भागांत रुंदीकरण झाल्यानंतर आता त्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळेही काही ठिकाणी एकाच लेनमधून दुहेरी वाहतूक सुरू आहे. अशा ठिकाणी मोठी बस,ट्रक आल्यास सर्वच वाहनांना वाट काढताना कसरत करावी लागले. त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे काही मोटारचालकांनी सांगितले.