PPE किट घालून पालकमंत्री कोरोनाबाधित रुग्णांच्या भेटीला




PPE किट घालून पालकमंत्री कोरोनाबाधित रुग्णांच्या भेटीला



ठाणे


करोनाबाधितांच्या उपचारात कुठल्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त १५० बेड्सची व्यवस्था करण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार, प्रिफॅब्रिकेटेड पोर्टेबल क्लिनिकच्या माध्यमातून हा क्षमताविस्तार करण्यात येत असून पहिल्या सहा बेड्स सोमवारपासून सेवेत दाखल करण्यात आल्या. याप्रसंगी स्वतः पालकमंत्री शिंदे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार उपस्थित होते. याप्रसंगी शिंदे यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस केली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचेही मनोबल उंचावले.