महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाई कामाची पाहणी

महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाई कामाची पाहणी: पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे दिले आदेश




ठाणे


महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुरू इसलेल्या नालेसफाई कामाची आज महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी पाहणी करून नालेसफाईची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी घनकचरा विभागास दिले. आज  महापालिका आयुक्त  सिंघल यांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी नाल्याचा प्रवाह मोकळा करणे, नाल्याची खोली वाढविणे प्रवाहातील अडथळे दुर करण्याबरोबरच ज्या ठिकाणी संरक्षक कठडा बांधण्याची गरज आहे त्या ठिकाणी संरक्षक कठडा बांधण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. त्याचबरोबर पावसाळ्यात पाणी कोठेही साचणार नाही तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी उच्च क्षमतेच्या पंपाच्या सहाय्याने पाण्याचा निपटारा करण्यसाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.      आजच्या पाहणी दौऱ्यात महापालिका आयुक्त  सिंघल यांनी उथळसर , केव्हीला नाला, हरदास नगर, रूणवाल नगर, थिराणी नाला, वर्तकनगर, मानपाडा येथील सोहम गार्डन नाला, चिरागनगर, नळपाडा, लोढा(आय थिंक) नाला आदी नाल्यांची पाहणी केली.