कळवा विभागात करोनाच्या भितीने माणुसकी लागली मरू

कळवा विभागात करोनाच्या भितीने माणुसकी लागली मरू


ठाणे


जगात कोरोना संसर्गामुळे सर्व सामान्यांना जीवाची इतकी काळजी पडली आहे की त्याच्या तील माणुसकी मात्र मरू लागली आहे.कोरोना विरोधात लढाईत डॉक्टर, पोलीस,नर्स,पत्रकार सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून सर्वसामान्य लोकांना मात्र सुरक्षित ठेवत आहेत.शासन व प्रशासन सतत मेहनत घेत असताना जे कर्तव्य बजावत असतांना कोरोना बाधित   अत्यावश्यक सेवेतील योद्धा चे मनोबल वाढवण्यासाठी विविध प्रयत्न करीत आहेत.कळव्यात एका गुरुकृपा सोसायटी या शंकर मंदिर या ठिकाणी मुंबई ला कार्यरत असणारे पोलीस कर्तव्य बजावत असताना दुर्दैवाने कोरोना बाधित झाले. शासन,प्रशासन, स्थनिक नेते मंडळी सबंदित व्यक्तीला व त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावली.नियमानुसार इमारत सील करण्यात आली, इमारतीतील नागरिक नियमांचे पालन ही तंतोतंत करीत आहेत.


सदर इमारतीत इतर ही पोलीस कर्मचारी राहतात.त्यातील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा मुलगा जर्जर आजाराने पीडित आहे त्यामुळे त्याना आठवड्यात दोन वेळा वर्तकनगर येथे डायलिसिस करण्यासाठी जावे लागते.पण आज त्याच्या जाण्याच्या सर्व रस्ते काही उपद्रवी व्यक्ती नि बंद करून त्यांच्याशी वाद घालू अरेरावी पणाची वागणूक दिली. विशेष म्हणजे एका पावलांवर इमारत असतांना त्यांना लांब वळसा मारून सहा फूट भिंतीवर कसेतरी चढत आदीच व्याधीने व्यथित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाला जीव मुठीत घेऊन कसबस उतरावे लागले.आता पुढच्या वेळी कसं डायलिसिस ला जायचं ही चिंता त्याना लागली आहे.आमचे पोलीस जीव पणाला लावून कर्तव्य कोरोना विरोधी लढाई पार पाडत असतांना त्यांच्या सबंदीत लोकांना अशी वागणूक काही खालच्या विचारांचे लोक देत असतील तर पोलिसांचं मनोबल कसं वाढणार असा सवाल स्वतः हया पोलीस कुटुंबाने केला आहे.या संदर्भात कळवा प्रभाग समिती सहा.आयुक्त यांना माहिती देण्यात आली होती पण मी दहा मिनिटात फोन करतो असं सांगून कोणतीही दखल घेतली नाही.