काम बंद आंदोलन केल्याने गर्भवती महिला योजनांपासून वंचित
ठाणे
गर्भवती महिला व नवजात शिशु यांची आरोग्य तपासणी तसेच शासनाकडून मिळणारे विविध योजनांचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात आली या माध्यमातून कर्मचार्यांनी चांगले काम करत गर्भवती महिला व नवजात शिशु या योजनेचा लाभ मिळवून दिला परंतु लाभ मिळवून देणारे कामगारच गेले ६ महिने पगारापासून वंचित आहेत.
गर्भवती महिला व नवजात शिशु यांची आरोग्य तपासणी तसेच शासनाकडून मिळणारे विविध योजनांचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी एक खिडकी योजना ठाणे मनपा हद्दीतील रहिवाशी गर्भवती महीलांकरीता सुरू करण्यात आलेली होती.या एक खिडकी योजने द्वारे केन्द्र तसेच राज्य शासनाकडून विविध योजनांचे माहिती व लाभ मिळवून देण्यात येत होता .ज्यामधे प्रत्येक गर्भवती महिलेला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत रुपये ५००० हजार ही मदत तसेच जननी सुरक्षा योजना याअंतर्गत रुपये सहाशे तसेच सिझरिन प्रसुती झाल्यास रुपये पंधराशे आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करिता गर्भवती महिलेला रुपये तेराशे अशा विविध प्रकारचे अनुदान मिळण्याची शासनाची योजना आहे तसेच रुग्णवाहीका सेवांचे संचलन सुध्दा करण्यात येत आहे.हा प्रकल्प जेव्हापासून सुरू झालेला आहे तेव्हापासून या एक खिडकी योजनेद्वारे दरवर्षी किमान पन्नास हजार गर्भवती महिलांना याचा लाभ मिळालेला आहे .परंतु नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी यांच्या हेकेखोर धोरणामुळे आणि असहकारामुळे या प्रकल्पाशी संबंधीची देयके हेतुपुरस्सरपणे प्रलंबित ठेवण्यात आलेली आहे ज्यामुळे या प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचारी यांची संख्या बावीस आहे तसेच यावर देखरेख करणारे व्यवस्थापकीय कर्मचारी यांना मागील सहा महिन्यापासून वेतन न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची कु-हाड कोसळली आहे आणि नाईलाजाने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे यासंबंधी माननीय स्थायी समिती अध्यक्ष तसेच मनपा आयुक्तांनी संबंधित वैद्यकीय अधिकार्याला वारंवार निर्देश देऊन सुद्धा त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने बिल काढण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू केलेली नाही व संबंधित वैद्यकीय अधिकारी आम्हाला सहकार्य करायचे खोटे आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रकल्प संचालक महेश कांडलकर यांनी यावेळी सांगितले
या काम बंद आंदोलनामुळे ठाणे मनपा हद्दीतील हजारो गर्भवती महिलांना या योजनांचा लाभ मिळण्यापासून त्या वंचित झाले आहेत आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून यासंबंधीची कुठलीही दुसरी योजना अद्याप तरी सुरु करण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आलेले नाही त्यामुळे लवकरात लवकर कर्मचाऱयांची देणी देऊन हा प्रकल्प सुरु करावा असे महेश कांडलकर यांनी सांगितले.