नाले सफाई तातडीने करण्याचे आयुक्तांचे आदेश

नाले सफाई तातडीने करण्याचे आयुक्तांचे आदेश



ठाणे :


२५ मे पर्यंत शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई होईल यासाठीचे प्रयोजन ठाणे महानगर पालिकेने आखले आहे. एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे त्यामुळे शहरातील अत्यावश्यक कामेही प्रलंबित परंतु ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नाले सफाईच्या कामांना वेग देण्यात आला आहे.


 शहरात आजच्या घडीला ८०० च्या आसपास कोरोना बाधीत रुग्णांची संख्या त्यामुळे त्यांच्या संपर्कातील रुग्णांवरही उपचार करणे, त्यांना क्वारंन्टाईन करणे अशी कामे पालिकेला करावी लागत आहेत. यामुळे पावसाळ्यापुर्वीची कामे रखडल्याची चिन्हे निर्माण झाली होती. दरवर्षी सखल भागात पाणी साचत असून याशिवाय, शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर सखल भागांव्यतिरिक्त अन्य ठिकाणीही नाले शेजारच्या घरांमध्ये पाणी शिरते. तर काही ठिकाणी सोसायटी आणि चाळींमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे नालेसफाईची रखडली तर यंदा नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे.


याशिवाय, आरोग्याचा प्रश्नही शक्यता वर्तविली जात आहे. असे असतानाच करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच आता पावसाळ्यापुर्वी नालेसफाईची कामे करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहेत. त्यामुळे नालेसफाईची कामे पावसाळ्यापुर्वी शक्यता निर्माण झाली आहे. त्यानुसार पालिकेच्या माध्यमातून युध्द पातळीवर नालेसफाईची कामे सुरु झाली आहेत. ही होतील असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.


ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी मंगळवारी शहरातील नालेसफाईच्या कामांची पाहाणी केली. त्यामध्ये प्रवाह मोकळा करणे, नाल्याची खोली वाढविणे, प्रवाहातील अडथळे दुर करण्याबरोबरच ज्या ठिकाणी संरक्षक कठडा बांधणे आदी कामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.