वाशीचे कामगार रुग्णालय विलगीकरणसाठी उपलब्ध करावे - गणेश नाईक

वाशीचे कामगार रुग्णालय विलगीकरणसाठी उपलब्ध करावे - गणेश नाईक



नवी मुंबई


शहरात कोरोना बाधीतांचा आकडा वाढतो आहे. कोरोना विरोधातील या लढाईमध्ये पालिकेला सक्षम करण्याची गरज आहे. राज्य कामगार विमा कर्मचारी मंडळाच्यावतीने वाशी येथील कामगार रुग्णालय इमारतीचा अलीकडेच पुनर्विकास करण्यात आलेला आहे. रुग्णालयाची प्रशस्त इमारत बांधून पूर्ण झाली असून वापराविना पडून आहे. ही इमारत नवी मुंबई महापालिकेकडे काही काळ कोरोना वरील वैद्यकीय उपचारासाठी आणि विलगीकरण पक्षासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी महत्त्वाची मागणी आमदार गणेश नाईक यांनी  पत्र पाठवून केंद्रीय आरोग्यमंत्री ,राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, आरोग्यमंत्री कामगार मंत्री , विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात रुग्णवाढीचा वेग जास्त असेल असा अंदाज केंद्रीय पथकाने याअगोदरच महाराष्ट्राचा पाहणी दौरा करताना वर्तविला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता नवी मुंबई महापालिकेला देखील विलगीकरण कक्ष आणि वैद्यकीय उपचारासाठी जास्तीत जास्त जागांची आवश्यकता भासणार आहे. सध्या नवी मुंबई महापालिकेने काही इमारती ताब्यात घेऊन त्याठिकाणी अलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. पालिका रुग्णालयांमधून आणि काही खाजगी रुग्णालयांमधून कोरोना वर उपचार सुरू आहेत. यापुढील काळात वाढत्या रुग्णसंख्येचा धोका ओळखून अधिकाधिक इमारती पालिकेला उपलब्ध करून घ्याव्या लागतील. 


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image