मुंब्र्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत ८ जणांवर गुन्हा दाखल

मुंब्र्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत ८ जणांवर गुन्हा दाखल
२०० दुकानदारांना नोटीसा तर मास्क न लावणाऱ्या ३२ जणांकडून १००० रुपयांचा दंड वसूल



ठाणे


कोविड १९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत ठाणे महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात कारवाई करीत असताना सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणे, सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या ८ व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा व साथीचे रोग अधिनियम या कलमान्वये मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशानुसार मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी ही कारवाई केली.
    सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणे व सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या मुंब्र्यातील पापा, अन्वर सय्यद, अबुल गणी मर्चंट, एस.एफ. रजा, फैजान शेख, इकबाल मोहम्मद अलीशेख, अफजल मोहम्मद बशीर शेख, मोहम्मद शाहीद शेख या व्यक्तींवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानासमोर सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, मास्क लावणे व तसेच न केल्यास साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल अशा आशयाच्या नोटीसा २०० दुकानदारांना बजावण्यात आल्या आहेत. तसेच मास्क न लावणाऱ्या ३२ दुकानदारांकडून प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी केली.