आरोग्य सेविकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ

आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ



मुंबई


 मुंबई महापालिका क्षेत्रात आणि विशेषत: झोपडपट्टीसारख्या आव्हानात्मक परिसरांमध्ये आरोग्य सेवा सुविधा देण्यासाठी सुमारे साडेतीन हजार आरोग्य स्वयंसेविका (CHV) कार्यरत आहेत. या सेविकांना दरमहा मिळणाऱ्या रुपये ५ हजार या मानधनात आता मासिक ४ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ सप्टेंबर २०१९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. सात महिन्यांच्या थकबाकीसह वाढीव मानधन 'मे' महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे. वरील व्यतिरिक्त 'कोरोना कोविड १९'च्या अनुषंगाने 'लॉकडाऊन' लागू झाल्यापासून आरोग्य स्वयंसेविकांनी जेवढे दिवस काम केले असेल, त्या प्रत्येक दिवसासाठी रुपये ३०० एवढे अतिरिक्त मानधन दिले जाणार आहे. ही रक्कम देखील त्यांना मे महिन्यात दिल्या जाणाऱ्या एप्रिल महिन्याच्या मानधनासोबतच दिली जाणार आहे.