दिवा शहराकरिता 10 एम एल डी पाणी उपलब्ध
ठाणे
दिवा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे या भागांमध्ये मोठ-मोठी निवासी गृहसंकुले उभी राहत असल्यामुळे या भागातील लोकसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याकारणाने दिवा शहरातील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत होते. दिवा शहराला पाण्याचा पुरवठा हा एमआयडीसी विभागाच्या माध्यमातून करण्यात येतो मात्र याचे व्यवस्थापन नियोजन हे ठाणे महापालिकेमार्फत करण्यात येते. दिवा शहरातील पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ठाणे महापालिका प्रशासन तसेच शासन दरबारी जलसंपदा विभाग व एमआयडीसी विभाग यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. सदर पाठपुराव्याला यश येऊन दिवा शहराकरिता 10 एम एल डी पाणी उपलब्ध झाले असल्याची माहिती माजी उपमहापौर व शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी दिली.
10 एम एल डी अतिरिक्त पाणी आता उपलब्ध झाले असल्याने नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर होणार आहे. दिवा शहरतील पाणी समस्या निकाली निघाल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , अध्यक्षा दिवा प्रभाग समिती दिपाली भगत, सभापती-क्रीडा समाज कल्याण व सांस्कृतिक कार्यक्रम समिती अमर पाटील, नगरसेवक शैलेश पाटील, दीपक जाधव नगरसेविका दर्शना म्हात्रे, सुनिता मुंढे, अंकिता पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ठामपा निवडणुकीत केलेल्या घोषणेची वचनपूर्ती झाली याबद्दल जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे.