ठाणे महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.शिल्पा सोनोने यांच्या प्रंसगासावधानतेमुळे बाळ-बाळंतीण सुखरूप







ठाणे महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.शिल्पा सोनोने यांच्या प्रंसगासावधानतेमुळे बाळ-बाळंतीण सुखरूप



ठाणे


बुधवार दिनांक 15/4/2020 रोजी ची घटना रात्री 12:30 am कोरोना लॉक डाऊन मध्ये बंद असल्या कारणाने अत्यंत गरिब अवस्थेत असलेल्या एका गर्भवती महिला अत्यंत नाजूक परिस्थिती मध्ये घरी प्रसुती वेदनेत विवळत होती. लॉक डाऊन मुळे तिच्या पतिचे काम बंद झाल्याने घरची एकदम बिकट परिस्थिती होती. त्या अवस्थेमध्ये हॉस्पिटलला कसे जायचे हा एक प्रश्नच होता.


अशा मध्येच त्यांची शेजारी सौ. मंजू येरुणकर यांनी सौ शिल्पा सोनोने अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेस यांना याबाबत सांगितले की मानपाडा गणेश नगर पोलीस लाईन येथे अत्यंत बिकट परिस्थितीत एक गर्भवती स्त्री विव्हळत आहे. मदतीसाठी ओरडत आहे. ती वेळ रात्री साडेबाराची होती. 


त्यानंतर शिल्पा सोनोने व त्यांची मुलगी डॉ. स्नेहा सोनोने समवेत घटनास्थळी पोहोचले तर ती स्त्री खूप खूप गंभीर परिस्थिती मध्ये होती. तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अत्यावश्यक सेवा 100 108 102 104 ला कळविण्यात आले पण तेथून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने  तिला सोनोने यांनी स्वत:च्या वाहनाने हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याचे ठरवले आणि कसेबसे जीव मुठीत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा ठाणे येथे ऍडमिट करण्यात आले.


अशातच तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की आम्ही डिलीव्हरीसाठी घेतोय पण आम्ही बाळाची गॅरेंटी देऊ शकत नाही कारण बाळाची हालचाल व हृदयाचे ठोके जाणवत नाही. त्यावर मी सांगितले की काहीही करून एक गरीब स्त्री ला जीवदान द्या अशी विनंती केली. त्यानंतर रात्री दोन वाजता डिलिव्हरी सुखरूप झाली आणि बाळ व बाळांतीन सुखरूप आहे असे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी शिल्पा सोनोने त्यांची मुलगी डॉ.स्नेहा सोनोने, मुलगा शुभम सोनोने, यांच्या विशेष सहकार्यासोबतच  मंजू येवरुणकर, त्यांचे पती राजू येवरुणकर, तसेच विभागातील नागरिकाचे सहकार्य लाभले.