कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक

कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक



ठाणे


 मुंबईत दररोज रुग्णसंख्या वाढते आहे. कमी झालेली प्रतिबंधित क्षेत्र पुन्हा वाढली आहेत.  त्याच वेळी ठाण्यातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. काल २४ एप्रिल रोजी दिवसभरात ठाणे महापालिका हद्दीत 20 कोरोनाबाधित दाखल झाले. ठाण्यात पहिल्यांदाच एका दिवसात एवढी रुग्णसंख्या वाढली आहे. ठाण्यात आता कोरोनारुग्णांची संख्या 198 झाली आहे. 163 रुग्ण प्रत्यक्ष शहरात उपचार घेत आहेत. तर मुंबईत 357 नवे रुग्ण दाखल झाले. आता कोरोनाबाधितांची संख्या 4589 झाली आहे.  मुंबईतील धोका लक्षात घेता प्रतिबंधित क्षेत्रातील संख्येतही मोठी वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत मुंबईत 813 प्रतिबंधित क्षेत्र होते त्यामध्ये वाढ करीत आता मुंबईतील हॉटस्पॉटची संख्या 930 पर्यंत पोहोचली आहे. भायखळा, कुर्ला, अंधेरी पश्चिम, लोअर परेल, अंधेरी पूर्व, मालाड या भागात प्रतिबंधित क्षेत्र आहेत. तर यापैकी 189 भागातील प्रतिबंध हटवण्यात आला आहे.  लॉकडाऊन असतानाही अनेकदा विविध कारणांनी लोक रस्त्यांवर गर्दी करतात. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा लोकांकडून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे.  मुंबई आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत आज 25 नवे रुग्ण आढळून आले आहे. येथे संसर्गावर नियंत्रण आणणे अवघड आहे. मात्र यासाठी तेथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image