ठाण्यातील विहंग्स इन हॉटेल आता आरोग्य विभागाच्या सेवेसाठी
*ठाण्यातील Hotel Vihang's Inn 'विहंग्स इन हॉटेल' आता आरोग्य विभागाच्या सेवेसाठी - आमदार प्रताप सरनाईक*

 

*कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे डॉक्टर, आरोग्य विभागातील व्यक्ती यांना राहण्यासाठी हे हॉटेल विनामूल्य देण्याचा निर्णय आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला*

 


 

ठाणे

 

सध्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या युद्धजन्य परिस्थितीत कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स तसेच एकूणच आरोग्य विभागाचे नियोजन पाहणारे आरोग्य विभागातील अधिकारी हे खऱ्या अर्थांनी देवदूत म्हणून काम करत आहेत. कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या तसेच आरोग्य खात्यातील महत्वाच्या व्यक्तीची राहण्याची सोय व्हावी म्हणून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वतःचे हॉटेल प्रशासनाला वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आपले 'विहंग इन' हे  हॉटेल पूर्णपणे डॉक्टर व आरोग्य खात्यातील लोकांना राहण्यासाठी देण्यात आले आहे , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी  दिली. 

 

मुंबई महाराष्ट्रासह ठाणे, पालघर जिल्ह्यात कोरोना पेशंटची संख्या वाढत आहे. आरोग्य सेवेतील डॉक्टर नर्स व इतर अधिकारी हे दिवस रात्र काम करीत आहेत. पेशंट वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढत आहे. जे कोरोनाग्रस्तांची सेवा करतात त्यांची चांगली सोय व्हावी किंवा त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्वतः आमदार प्रताप सरनाईक गेले काही दिवस जातीने लक्ष ठेऊन आहेत. ठाणे घोडबंदर रोडवर 'विहंग इन' या हॉटेल मध्ये 3 बँकवेट हॉल व राहण्याच्या 32 रूम आहेत. हे हॉटेल आरोग्य विभागासाठी आपण देण्याचा निर्णय घेतला. ठाणे शहरातील कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे डॉक्टर व आरोग्य विभागातील व्यक्ती यांना राहण्यासाठी हे हॉटेल पूर्णपणे विनामूल्य देत असल्याचे आमदार सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले.

 

जो पर्यंत 'कोरोना' विषाणू पूर्णपणे जात नाही तो पर्यंत आरोग्य खाते काम करीत राहणार आहे. आरोग्य खात्याला गरज असेल तोपर्यंत आपले हॉटेल आपण त्यांना देत आहोत , असेही सरनाईक म्हणाले. कोरोना विषाणू ला रोखण्यासाठी सरकार उपाय योजना करत आहेत. ठाणे आणि मीरा भाईंदर शहरातही आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसात विविध उपक्रम राबवले आहेत. 'लॉक डाउन'च्या काळात एकही दिवस घरी न बसता सतत लोकांच्या मदतीसाठी सरनाईक हे सक्रिय असल्याचे गेल्या 20 दिवसात दिसले आहे. ठाणे आणि मीरा भाईंदर शहरात कोरोनाग्रस्तांची सेवा करणारी आरोग्य यंत्रणा याना जे जे सहकार्य लागेल ते सगळे केले जाईल , असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. 

 

*24 तास काम करत आहे आरोग्य विभाग*

 

ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स, औषध निर्मिती अधिकारी तसेच आरोग्य खात्यातील इतर अधिकारी हे 24 तास काम करत आहेत. दिवस रात्र आरोग्य खाते काम करत आहे. संचारबंदी असल्याने रात्री अपरात्री , अवेळी कर्तव्य बजावून या आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या घरी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे डॉक्टर व आरोग्य खात्यातील कर्मचारी यांच्या राहण्याची सोय या हॉटेल मध्ये करण्यात आली आहे , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. 

 

Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image