अंबरनाथवासियांकडून १५ लाखाचा निधी मुख्यमंत्री सहाय्याता निधीस


अंबरनाथवासियांकडून १५ लाखाचा निधी मुख्यमंत्री सहाय्याता निधीस


अंबरनाथ


कोरोनाच्या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये सहकार्य करून योजना यशस्वी  करण्यात योगदान देण्याचे आवाहन  शहरप्रमुख अरविंद  वाळेकर आणि  नगराध्यक्षा मनिषा  वाळेकर यांनी  नागरिकांना केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अंबरनाथवासियांनी सुमारे  १५ लाखाचा निधी जमा करून नगराध्यक्षा मनिषा  वाळेकर यांच्या आवाहनाला शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे.


अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे २० एप्रिल रोजी  नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह अंबरनाथ शहरातील सुमारे १२५  सर्वसामान्य नागरिकांनी, व्यापारी  आणि  नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधीत” धनादेश जमा करून सुमारे १४ लाख ४७ हजार ५४७ रुपयांचा निधी जमा  चांगला प्रतिसाद दिला आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याकरिता अंबरनाथकरांना आवाहन केले होते, या आवाहनाला अंबरनाथकरांनी प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत धनादेश देत मदत केलेली आहे. सुमारे ११ लाखांपर्यंत निधी जमा होईल असा अंदाज  होता, परंतु  त्यापेक्षाही जास्त निधी जमा झाला, असे नगराध्यक्षा मनिषा  वाळेकर यांनी सांगितले.