कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १५४ आरोग्य पथकामार्फत १४ दिवस सर्वेक्षण

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १५४ आरोग्य पथकामार्फत १४ दिवस सर्वेक्षण



कल्‍याण


कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ४ नविन रूग्‍ण आढळून आले, कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेंटमेंट प्लॅनप्रमाणे महापालिकेचे १५४ आरोग्य पथकामार्फत १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व  रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.  आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू असून नागरिकांनी घाबरून न जाता  सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रूग्‍णालयाशी संपर्क साधावा,महापालिकेच्या आरोग्य पथकास सहकार्य करावे तसेच अधिक माहितीकरीता बाई रूक्‍मीणीबाई रूग्‍णालय, कल्‍याण येथील ०२५१-२३१०७०० व शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली येथील ०२५१-२४८१०७३ व ०२५१-२४९५३३८ या हेल्‍पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.


यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रूग्‍णसंख्‍या आतापर्यत *२८ *(निळजे प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील ०१ रूग्‍ण धरून)  झाली आहे. नवीन रूग्‍णांपैकी ०१ महिला रूग्‍ण(५४ वर्ष) ह्या  डोंबिवली पूर्व भागातील आहे. तिला तापाची लक्षणे जाणवल्यामुळे ती खाजगी रुग्णालयात भरती झाली होती.  इतर २ महिला रुग्णापैकी( वय अनुक्रमे ७५ वर्षे व ७ वर्षे ) ह्या  देखील डोंबिवली पूर्व भागातील असून त्या कोरोंना  बाधित रुग्‍णाच्या निकट सहवासित आहेत. चौथी महिला रुग्ण डोंबिवली पश्चिम येथीलअसून ( वय २४ वर्षे)सदर महिला पॅरिस येथून परत आली होती. सदर चारही कोरोना बाधित रुग्ण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.