धनगर समाज संघर्ष समितीतर्फे गरजू नागरिकांना मदतीचा हात
ठाणे
धनगर समाज संघर्ष समिती ठाणे जिल्हा व उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाजातील गरजूंना जीवनावश्यक वास्तुचे वाटप करण्यात आले,
कोरोना संसर्ग वाढू नये यामुळे लॉकडाऊन करण्यात आलेला असल्याने व्यवसाय बंद आहेत यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना सर्वच सामाजिक संस्था मदतीचा हात देत आहेत. ठाणे जिल्ह्यात धनगर समाजाची संख्या जास्त आहे. या समाजातील अनेक नागरिकांची परस्थिती देखील कमवणार तर खाणार अशी असल्याने आता लोकडाऊनच्या काळात या नागरिकांचे हाल होत असल्याची बाबा समोर येत असल्याने या नागरिकनांच्या मदतीला धनगर समाज संघर्ष समिती ठाणे जिल्हा व उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ या संस्था पुढे आल्या असून त्याच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर, दिवा, कोळेगाव, डोंबीवली, पिसवली, तीसगाव, काटेमानीवली, विठ्ठलवाडी, कल्याण पश्चिम,शहाड आदीचे भागातील समाजबांधवांना १० किलो गहू,५ किलो तांदुळ,अर्धा किलो प्रत्येकी चनादाळ/तुरदाळ,१ किलो तेल,हळद ,सॕनिटायझर आदी जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. यासाठी महेंन्द्र परदेशी, पृथ्वीराज फुसलंगे, संजय गेंदा, सुनिल मनोरे, अरुण गोरख परदेशी, सुनिल लांडगे, संदिप पांढरे,सुधाकर परदेशी, यानी परिश्रम घेतले,ठाणे जिल्ह्यातील गरजू व भटकंती करणाऱ्या समाजबांधवांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास संपर्क करण्याचे आव्हान संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी (धनगर) यानी केले आहे.
समाजबांधवांना मदत करण्यासाठी संस्थेला जिंतेद्र परदेशी,सुनिल परदेशी, रमेश परदेशी,तुषार धायगुडे,नामदेव परदेशी, डोगर नारायण परदेशी, सुनिल परदेशी, पृथ्वीराज गढरी,विनोद धनगर,आण्णासाहेब गढरी,सुरेश परदेशी, रमेश परदेशी(मुख्याध्यापक), रविंद्र परदेशी, गणेश विठ्ठल गढरी, डाँ सुरेश धनगर, उत्तम नामदेव गढरी,लक्ष्मीकांत परदेशी (केंद्रप्रमुख), रमेश परदेशी, निंबा गढरी , प्रकाश परदेशी, प्रकाश परदेशी ,राजेश परदेशी,सुनिल शंकर परदेशी कल्याण, योगेश परदेशी, रणजीत पांढरे, सुधाकर ठोके ,राजेश परदेशी,आदी सह समाजबांधवांनी या उपक्रमाला सहकार्य केले.