लॉकडाऊनमध्येही नगरसेवकाची बर्थडे पार्टी

लॉकडाऊनमध्येही नगरसेवकाची बर्थडे पार्टी



पनवेल


देशात कोरोनामुळे लॉकडाऊन असताना पनवेलमध्ये एका भाजप नगरसेवकाने मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू आहे. लोक सोशल डिस्टिंसिंग पाळत आहेत आणि इकडे नगरसेवकाने नियम धाब्यावर बसवल्याने आदर्श नागरिक कोण असा प्रश्न उपस्थित राहतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नगरसेवक अजय बेहरा यांनी त्यांच्या 10 मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. 10 मित्रांसोबत बर्थडे पार्टी करताना त्यांनी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आहे. पनवेल पोलिसांनी केली 11 जणांवर कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात पार्टी करताना अटक करणारी राज्यातील पहिलीच घटना आहे.


दरम्यान, घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टिंसिंगचा वापर करा अशा अनेक सूचना माध्यमांमधून, प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून देण्यात येत आहेत. पण त्याच नियमांचं उल्लंघन करत जर नगरसेवकानेच असं कृत्य केलं तर नागरिक कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार असा प्रश्नच आहे. त्यामुळे नगरसेवक अजय बेहराचा नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. यावर आता कठोर कारवाई कर महापालिका आयुक्त नगरसेवकपद रद्द करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, घराच्या बाहेर पडू नका, घरात असतानाही अंतर ठेवून बसा अशा सूचना देऊनही शहराचे अधिकारीच असे नियम मोडतात त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image