मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी, याकरिता महाविकास आघाडी राज्यपाल  भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी, याकरिता महाविकास आघाडी राज्यपाल  भेट



मुंबई :


कोरोनानंतर उन्द्रवलेल्या परिस्थितीमुळे राज्यपालांनी त्यांच्या कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर तातडीने कार्यवाही करावी, याकरिता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी विनंतीचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देण्यात आले आहे. विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशीवरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या नियुक्तीबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही, त्यामुळे राजकीय तणाव निर्माण झाला आहे.