टोरेंट ग्रुपच्या वतीने महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधी कोविड - 19 साठी 5 कोटी रुपयांचे योगदान
ठाणे
कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपला देश अभूतपूर्व मानवी आणि आरोग्य संकटात सापडला आहे. या साथीच्या आजाराचा महाराष्ट्र राज्यावर जास्त परिणाम झाला आहे. टोरेंट ग्रुप संस्थेने लोक आणि समाज यांना नेहमीच सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचे स्थान दिले आहे. विशेषत: अशा प्रकारच्या संकटाच्या वेळी या साथीला सामोरे जाण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या प्रत्येक संभाव्य प्रयत्नांना पाठिंबा देण्यास टोरेंट ग्रुप वचनबद्ध असतो. या पार्श्वभूमीवर टोरेंट ग्रुप ने महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधी कोविड - 19 मध्ये 5 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
टोरेंट ग्रुपच्या या योगदानामुळे कोविड-19 या साथीच्या रोगास महाराष्ट्र सरकारच्या प्रतिसादाला बळकटी मिळेल आणि त्यामुळे होणारा मानवी परिणाम कमी होण्यास मदत होईल. आपल्या समाजाने अशा महाकाय संकटाचा कधीही सामना केला नाही आणि या संकटाच्या वेळी आम्ही आपल्या देशातील लोकांच्या पाठीशी उभे राहण्यास कटिबॆ आहोत असा विश्वास टोरेंट ग्रुप ने व्यक्त केला आहे.
टोरेंट ग्रुप बद्दल
21,000 कोटी (3 बिलियन अमेरिकन डॉलर्स) च्या भागभांडवलासह टोरेंट ग्रुपची फार्मास्युटिकल्स, वीज आणि शहर गॅस वितरण क्षेत्रात उपस्थिती आहे. टोरेंट ग्रुपची प्रमुख कंपनी टोरेंट फार्मा ही हृदय व इतर आरोग्य विभागातील प्रमुख अग्रगण्य उत्पादक असून जागतिक पातळीवर 40 देशांमध्ये उपस्थिती आहे. टोरेंट पॉवर ही देशातील ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी खाजगी कंपनी आहे आणि संपूर्ण वीज मूल्य शृंखला - वीज निर्मिती, प्रसारण आणि वितरण यावर उपस्थिती आहे. टोरेंट पॉवरची 3,721 मेगावॅटची स्थापित उत्पादन क्षमता असून 3 राज्यांत 8 शहरांमध्ये 32 लाखांहून अधिक ग्राहकांना वीज वितरण केले जाते.
टोरेंट गॅस, ग्रुपचा व्यवसाय, ही देशातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे आणि 7 राज्ये (महाराष्टः, उत्तर फ्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, तामिळनाडू आणि तेलंगणा आणि 1 पेंद्र शासित फ्रदेश (पुडुचेरी)) मधील 32 जिह्यांना कव्हर करणाऱया 16 जागांसाठी अधिकृत केले गेले आहेत. टोरेंट अधिकृत क्षेत्राची एकूण लोकसंख्या 9 कोटींपेक्षा जास्त आहे, जी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 7 टक्के आहे.