कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पथदर्शी उपक्रम
कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी व
महापालिकेच्या नागरीकांना सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेने ८ नागरी आरोग्य केंद्रावर ‘’तापाचे दवाखाने’’ इंडियन मेडीकल असोशिएशन कल्याण व डोंबिवली यांच्या मदतीने सुरू करण्यात आले आहेत.
सध्याच्या आपत्कालीन परिस्थीतीत रूग्णांना सेवा देण्याकरीता इंडियन मेडीकल असोशिएशन (कल्याण व डोंबिवली) तसेच निमा, केम्पा, होमिओपॅथीक असोशिएशन यांनी महापालिकेस जनरल डॉक्टर्स व इतर तज्ञ डॉक्टर्सच्या सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे, पालिका क्षेत्रातील रूग्णांना सेवा देतांना महापालिकेस सुलभ होणार आहे. अशाप्रकारे, महापालिका क्षेत्रातील आयएमए, निमा केम्पा, होमिओपॅथीक असोशिएशन यांचे मदतीने रूग्णांन सेवा देणे हा महापालिकेचा एक पथदर्शी उपक्रम ठरू शकेल.अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी दिली.