नगरसेवकांनी १० लाख नगरसेवकनिधी महापालिकेस वर्ग करावा
ठाणे
कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे संपूर्ण देशात गेले कित्येक दिवस लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे गोरगरीब कामगार वर्ग कोणतीही कमाई नसल्याने हवालदिल झालेला आहे. बहुतेक गरिबांच्याकडे असलेले अन्नधान्य तसेच पैसे आता संपलेले आहेत. त्यांना दोन वेळचे जेवण मिळनेसुद्धा जिकरीचे बनले आहे. परिस्थिती अशीच राहिली भीषण परिस्थिती उद:भऊ शकते सबब दंगल सदृष्य लुटमार सुरु होऊ शकते.
अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेता ठाणे महापालिकेच्या सर्व नगरसेवकांनी रुपये १० लाख नगरसेवकनिधी प्रती नगरसेवक महापालिकेस वर्ग करावा. त्यासाठी लागणारी स्थायी समितीची मंजुरी घेऊन तसा ठराव राज्यशासनाकडे त्वरित मंजुरीसाठी पाठवावा व कोरोना लॉकडाऊन मुळे बाधीत हातावर पोट असणारे गोरगरीब नागरिक यांना नगरसेवक निधीतून अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा. तसेच गरज भासल्यास सोबत जोडलेले भांडवली खर्च यावर्षी कमी करावेत व त्यातील काही निधी वापरावा. अशी मागणी जाग – Joint Action & Awareness Group या संस्थेतर्फे करण्यात येत आहे.