संजयभोईर फाऊंडेशन व साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने भोजन वाटप
ठाणे
संपूर्ण राज्यात संचार बंदी लागू असल्याने आज सर्व पोळीभाजी केंद्र, कॅन्टीन बंद असल्याने २४ तास कार्यरत असणारे आपले पोलिस कर्मचारी बांधव तसेच सर्व गरजूंना जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. हि सर्व बाब लक्षात घेऊन ठाण्यातील बाळकूम परिसरातील संपूर्ण प्रभागात कार्यरत असणाऱ्या पोलिस बांधवांना व गरजूंना संजय भोईर फाउंडेशन व श्री. साईबाबा मंदिर ट्रस्ट च्या वतीने जेवण उपलब्ध करुन त्याचे वाटप केले.