नवी मुंबई पालिका निवडणूक पुढे ढकलण्याची आमदार आव्हाड यांची मागणी

नवी मुंबई पालिका निवडणूक पुढे ढकलण्याची आमदार आव्हाड यांची मागणी



नवी मुंबई :  


 नवी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कामालादेखील लागले आहेत. प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे.  मात्र, राज्यात कोरानाचं संकट आल्यामुळे ही निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या अगोदर मनसेने ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन काही शहरांमध्ये सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. नजिकच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नियत वेळी होणार आहेत.


उपरोक्त निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक एकमेकांच्या संपर्कात येतील. त्यामुळे या संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगपालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी, असे सुचविण्यात येत आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी पत्रात म्हटलं आहे.


“राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. देशात १०१ जण कोरोना बाधित आहेत. यापैकी राज्यात ३१ जण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी म्हणून सर्व शाळा, कॉलेजला ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय राज्यातील सर्व मॉल्स, चित्रपट थिएटर्स देखील बंद करण्यात आली आहेत.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image