मनसेच्या रोजगार विभागाच्या वतीने वाहतूक पोलिसांना सॅनिटायझरचे वाटप 

मनसेच्या रोजगार विभागाच्या वतीने वाहतूक पोलिसांना सॅनिटायझरचे वाटप 




 ठाणे

कोरोना विषाणूमुळे सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर सुरक्षतेच्या दृष्टीने सॅनिटायझरची आवश्यकता असल्याने नागरिकांसाठी रस्त्यावर काम करणाऱ्या वाहतूक पोलिस,सफाई कर्मचारी व नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण स्वयंरोजगार विभागाच्या वतीने मोफत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले .

 देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे सर्वत्र धास्ती निर्माण झाली असून लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. मात्र, वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावावे लागत आहे. शहरातील विविध भागात दिवसभर हे वाहतूक पोलीस उभे असतात तसेच हे वाहतूक पोलीस दररोज अनेक लोकांच्या संर्पकात येत असून त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण स्वयंरोजगार विभागाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रतीक जाधव यांच्या पुढाकाराने शनिवारी तीन हात नाका येथील वाहतूक शाखा कार्यालयाबाहेर  शहरात विविध ठिकाणी काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांना तसेच शहराची स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी व गरजू नागरिकांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले  यावेळी अभय फळे,सिद्धेश चिपळूणकर,संदीप आंबेर,ऋषिकेश साळवी आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.