खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने जेवणाची व्यवस्था
डोंबिवली
सध्या सुरु असलेल्या देशव्यापीच्या काळात कोरोना विषाणूबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण देशभरात लॉकडाऊनचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. घराबाहेर पडता येत नसल्यामुळे कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे तसेच हाथावर पोट असणाऱ्या गरीब व गरजू वंचित वर्गातील नागरिक तसेच नाका कामगार यांची उपासमार होऊ नये यासाठी रोजच्या हजारो नागरिकांना जेवणाची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची तयारी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या पुढाकाराने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, डोंबिवली येथे सुरु करण्यात आली.
सोशल डीस्टन्सिंगपेक्षा सामाजिक बांधिलकीचा परिचय या निमित्ताने घडून आलेला पाहायला मिळत आहे. तसेच शहरातील पोलीस बांधवांना देखील अन्नदान व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कल्याण लोकसभा उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख राजेश मोरे, विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, सुधीर पाटील, उपशहरप्रमुख विवेक खामकर, अभिजित थरवळ, तसेच युवसेनेचे राहुल म्हात्रे, जितेन पाटील हे यामध्ये सहभागी होते.